संरक्षण क्षेत्रातलं द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याबाबत भारत आणि जर्मनी यांच्यात सहमती

Raksha Mantri-Rajnath Singh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

India and Germany agree to strengthen bilateral defense cooperation

संरक्षण क्षेत्रातलं द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याबाबत भारत आणि जर्मनी यांच्यात सहमती

उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीसाठी जर्मनीला दिले आमंत्रण

भारताचे कुशल कर्मचारी तसेच स्पर्धात्मक किमती आणि जर्मनीचे उच्च तंत्रज्ञान तसेच गुंतवणूक यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील

Raksha Mantri-Rajnath Singh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 6 जून, 2023 रोजी नवी दिल्ली येथे जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या मंत्र्यांनी विद्यमान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांचा आढावा घेतला आणि सहकार्य वाढवण्याचे विशेषतः संरक्षण औद्योगिक भागीदारी वाढवण्याचे मार्ग यावर चर्चा केली.

भारत आणि जर्मनीनं संरक्षण क्षेत्रातलं द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासह या क्षेत्रातली औद्योगिक भागीदारी आणखी वाढवण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या वचनबध्दतेवर सहमती दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्यात आज नवी दिल्ली इथं झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरच्या बैठकीत हा निर्णय झाला.

भारत आणि जर्मनी सामायिक उद्दिष्टे आणि कुशल कार्यबल आणि भारतातील स्पर्धात्मक किमती तसेच जर्मनीचे उच्च तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यांसारख्या भक्कम पूरक घटकांच्या आधारे अधिक दृढ सहजीवी संबंध निर्माण करू शकतात यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.

भारत आणि जर्मनी यांच्यात 2000 पासून धोरणात्मक भागीदारी आहे, जी 2011 पासून सरकार प्रमुखांच्या स्तरावर आंतर-सरकारी सल्लामसलतींद्वारे मजबूत केली जात आहे.

यावेळी दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक मुद्द्यांवर आणि परस्परांच्या प्राधान्य क्रमांबाबत चर्चा केली. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधल्या संरक्षण उत्पादन कॉरिडॉरसह, संरक्षण उत्पादन क्षेत्रात जर्मनीसाठी असलेल्या गुंतवणुकीच्या नव्या संधी राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केल्या. भारताचं कुशल मनुष्यबळ आणि स्पर्धात्मक किमतींसह, जर्मनीचं तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीमुळे संरक्षण क्षेत्रातले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *