सक्तवसुली महासंचालनालयाकडून अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल.

Supplementary charge sheet filed against Anil Deshmukh by Directorate General of Recovery.

सक्तवसुली महासंचालनालयाकडून अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल.

मुंबई: सक्त वसुली महासंचालनालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी पूरक आरोपपत्र दाखल केलं आहे.former Maharashtra Home Minister Anil Deshmukh
यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या आपल्या पसंतीप्रमाणे करण्याविषयी ते आग्रही राहिल्याचं म्हटलं आहे. अशा याद्या बनवून ते अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मुंबई पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्यांशी सल्लामसलतीनं निर्णय घेत असत. उमेदवारांना आपल्या पसंतीच्या स्थळी नियुक्ती वा बदली मिळावी यासाठी त्यांच्याकडून अवैध वसुली होत होती का याविषयी सक्त वसुली संचालनालय तपास करत आहे.
यामध्ये १२ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सचिन वाझेला १६ वर्षांच्या बडतर्फीनंतर पुन्हा मुंबई पोलीस सेवेत घेण्यात आलं. याप्रकरणी देशमुखांचा हात असल्याचा आरोप आहे. अनिल देशमुखांनी मात्र या सर्व आरोपांचा साफ इन्कार केला आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *