सन २०२१-२२ रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन

सन २०२१-२२ रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन

कृषि विभागामार्फत शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महा-डीबीटी पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in/) विकसित केले आहे. महाडीबीटी पोर्टलमार्फत शेतक-यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके अंतर्गत सन २०२१-२२ रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरण, पिक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलमार्फत मागविण्यात येत आहेत. ३० ऑगस्ट २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात येत आहे, विहीत मुदतीत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच विचार केला जाईल, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळविले आहे.

एकुण किंमतीच्या ५० टक्के मर्यादित अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणास एका शेतक याला २ हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाणार आहे.

ज्वारी, हरभरा ही पिके असून प्रमाणित बियाणे वितरण १० वर्षाच्या आतील वाण ज्वारी-३० (प्रति किलो) हरभरा-२५(प्रति किलो) तसेच १० वर्षाच्या वरील वाण ज्वारी-१५(प्रति किलो) हरबरा -१२(प्रति किलो) असे आहे.

पिक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पिक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित शेतक-यांनी आपल्या गावच्या कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन १० हेक्टर क्षेत्र असणा-या गटांनी नोंदणी करावी. पिक प्रात्यक्षिकांसाठी एका शेतक-याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध होणार आहे. बियाणे जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये पिक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी पिक प्रात्यक्षिकांसाठी एका शेतक-याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध होणार आहे. या निविष्ठांसाठी शेतक-याला एक एकराच्या मर्यादित पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार २००० ते ४००० प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

शेतक-यांची निवड ऑनलाइन लॉटरी पध्दतीने होणार आहे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *