समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू

28 people died in a terrible accident of a private bus on the Samriddhi highway in the middle of the night समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

28 people died in a terrible accident of a private bus on the Samriddhi highway in the middle of the night

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

महाराष्ट्रातील बुलढाणा येथील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त.
महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; राज्यपालांकडून शोक व्यक्त28 people died in a terrible accident of a private bus on the Samriddhi highway in the middle of the night
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळखुटा इथं हा अपघात झाला. टायर निखळल्यानं धावती बस पलटली, आणि दुभाजकाला धडकून रस्त्यावर घासत गेल्यानं तिने पेट घेतला, त्यात २८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू .

बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अपघात स्थळी धाव घेत, मदतकार्याचा आढावा घेतला. अपघातातल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.

समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजा नजीक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात २८ जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहे. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भेट दिली. यावेळी मंत्री गिरीष महाजन, संदिपान भुमरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, श्वेता महाले, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना झोपेची डुलकी आदी कारणांमुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येईल.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा अपघातस्थळी पोचली. बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. खाजगी प्रवासी वाहतुकीमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जाते. तसेच वाहनचालकाला समुपदेशन केले जाते. वाहन किंवा वाहनचालक योग्य पात्रतेचे नसल्यास त्यांना परत पाठवले जाते. यामुळे प्रवाशांची आणि वाहनचालकांची नाराजी होते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक नियंत्रण केले जात आहे.

अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमींना योग्य तो उपचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्रातील बुलढाणा येथील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त.

पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले असून या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत रुपात देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने खूप दुःख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत ही सदिच्छा. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.”

“ बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50,000 रुपये मदत स्वरूपात दिले जातील”.

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातातल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विट संदेशात उपराष्ट्रपती म्हणाले; “महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेतल्या जीवितहानीमुळे अतिशय दु:ख झाले. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयासोबत आहेत. या कठीण काळात त्यांना बळ आणि आधार मिळो. जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या हव्यात हीच प्रार्थना.”

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; राज्यपालांकडून शोक व्यक्त

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पिंपळखुटा येथे खासगी बसला अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हृदय पिळवटून टाकणारे आहे. दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या तीव्र शोकसंवेदना मृतांच्या आप्तेष्टांना कळवतो. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *