सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ च्या चाचण्या वाढवण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश.

Union Health Ministry asks States/UTs to enhance testing to check the spread of Covid-19 more effectively.

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ च्या चाचण्या वाढवण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश.Omicron-Variant Image

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याकरिता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी विशिष्ट भागात रुग्ण वाढीचा दर लक्षात घेता ताबडतोब चाचण्या वाढवण्याच्या स्पष्ट सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत, जेणेकरुन कोविड-19 साथीच्या आजाराच्या प्रसाराचा प्रभावी मागोवा ठेवता येईल आणि तत्काळ नागरिक-केंद्रित कारवाई सुरू करता येईल.

त्या म्हणाल्या  की कोविड-19 चे नवीन प्रकार – ओमिक्रॉन, प्रमाण देशात वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील याविषयी चिंता व्यक्त केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून असं निदर्शनास येतं की अनेक राज्यात चाचण्यांचं प्रमाण कमी झालं आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि या आजाराचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी चाचण्या करणं अतिशय उपयुक्त असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचणी वाढवण्यास सांगितले आहे जेणेकरुन कोविड-19 साथीच्या आजाराच्या प्रसाराचा प्रभावी मागोवा ठेवता येईल आणि तत्काळ नागरिक-केंद्रित कारवाई सुरू करता येईल.

त्यांनी आठवण करून दिली की ICMR द्वारे जारी केलेल्या सर्व सल्ल्यांमध्ये, मूळ उद्दिष्ट त्वरित विलगीकरण आणि काळजीसाठी प्रकरणे लवकर शोधणे हा आहे. सुश्री आहुजा म्हणाल्या की, या व्यतिरिक्त, साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनासाठी चाचणी ही एक महत्त्वाची रणनीती राहिली आहे कारण यामुळे नवीन क्लस्टर्स आणि संसर्गाचे नवीन हॉटस्पॉट ओळखण्यात मदत होते ज्यामुळे कंटेनमेंट झोनची स्थापना, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटाइनिंग यांसारख्या प्रतिबंधासाठी त्वरित कारवाई करणे सुलभ होऊ शकते.

त्या म्हणाल्या, यामुळे राज्य आणि जिल्हा प्रशासनांना संसर्गाचा प्रसार रोखता येईल आणि मृत्यू आणि आजारपणात घट होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *