सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अकराव्या अधिवेशनची श्री क्षेत्र आळंदी येथे सुरुवात.

Sahakar Bharati is working as a Non-Political and Non-Government organization

सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अकराव्या अधिवेशनची श्री क्षेत्र आळंदी येथे सुरुवात.
Sahakar Bharati is working as a Non-Political and Non-Government organization

समाज कल्याणासाठी सहकारी संस्थाचे योगदान महत्वाचे असून विश्वास हा त्यांचा महत्वाचा पाया आहे. सर्व सामान्यांचे दुःख सहकारी संस्थानी कमी केले तर सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत होईल असे मत राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक अनिल कवडे यांनी व्यक्त केले आहे.सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अकरावे अधिवेशन आजपासून श्री क्षेत्र आळंदी येथे सुरु झाले. अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ते सहकार चळवळ आणि शासनाच्या अपेक्षा या विषयावर ते बोलत होते.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सहकार भारतीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. व्यासपीठावर आरबीआय संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ उदय जोशी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष विष्णू बोबडे, प्रदेश अध्यक्ष डॉ मुकुंद तापकीर, विधानसभा माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, प्रदेश महामंत्री विनय खटावकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.कवडे म्हणाले, शंभर वर्षापेक्षा अधिक काळ सहकार चळवळ रुजली आहे. त्यात अनेक चढ उतार झाले. मात्र काही ना काही कारणाने चळवळ अडचणीत आली आहे. केवळ संपत्ती, साधनांचा विकास याबरोबर आचार विचार याचा विस्तार होणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच शासनाच्या आहेत. मात्र यामध्ये सहकारी संस्थानी संख्यात्मक वाढीबरोबर सदभावना, मूल्य याचाही विचार करावा. याबरोबर संस्काराला तितकेच महत्व द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री मराठे यांनी बीजभाषणात सहकारातून समृद्धी या वर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, देशात सहकार क्षेत्रात अनेकविध संस्था कार्यरत आहेत. असे असले तरी आपणांस काम करण्यास खूप वाव आहे. लोकक ल्याणाचा विकास हा सहकारातून होणार आहे. त्यासाठी आपण नवीन क्षेत्र निवडण्याची गरज आहे. त्यामध्ये कृषी प्रक्रिया, नागरिकांना सेवा देऊ शकतील अशा सोसायट्या, पशुसंवर्धन अशी अनेक क्षेत्र आहेत. यामुळे ग्रामीण शहरी भाग नव्याने जोडला जाणार आहे. याखेरीज नवनवीन प्रयोग होणे अपेक्षित आहे. जेणे करुन सहकार अधिक व्यापक होणार आहे असे ते म्हणाले.

सुरुवातीला श्री खटावकर यांनी गेल्या चार वर्षातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. अध्यक्ष श्री तापकीर यांनी प्रास्ताविकात अधिवेशनाच्या आयोजनामागची भूमिका मांडली.श्री दादा विचारे यांनी आभार मानले. श्रीकांत पटवर्धन यांनी स्वागत गीत सादर केले. उद्या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *