सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 2 व 3 ऑक्टोबर रोजी आळंदीत.

Publication of Sahakar Maharshi Grantha by Nitin Gadkari.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 2 व 3 ऑक्टोबर रोजी आळंदीत.

सहकार महर्षी ग्रंथाचे ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन.  Publication of Sahakar Maharshi Grantha by Nitin Gadkari.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे 11वे त्रैवार्षिक अधिवेशन श्री क्षेत्र आळंदी येथे, फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात संपन्न होत असून अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, आमदार हरिभाऊ बागडे व राष्ट्रीय महामंत्री डॉ.उदय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात सहकार चळवळीशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार असल्याची माहिती सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.मुकुंद तापकीर, महामंत्री विनय खटावकर व राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे दिली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (2 ऑक्टोबर) सायं.5.30 वाजता होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष व सहकार भारतीचे पहिले सरचिटणीस आमदार हरिभाऊ बागडे यांचा स्व.माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून यावेळी सहकार महर्षी ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. रोख रु.51 हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी राज्याचे सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील, आ.राधाकृष्ण विखे पाटील, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, आळंदीच्या नगराध्यक्षा सौ. वैजयंताताई उमरगेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात राज्याची सहकाराची सद्यस्थिती व शासनाच्या अपेक्षा या विषयावर सहकार आयुक्त अनिल कवडे हे मार्गदर्शन करणार असून सहकारातून समृध्दी या विषयावर सतीश मराठे यांचे बीजभाषण होणार आहे; तर दुपारी 2 वाजता सायबर सुरक्षा व सायबर क्राईम हा परिसंवाद होईल. दुसर्या दिवशी रविवार दि.3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महिला बचतगट व सहकार या विषयावर अंबिका महिला औद्योगिक संस्थेच्या कमलताई परदेशी यांचे मार्गदर्शन तर फळे-भाज्या प्रक्रिया विषयासंदर्भात ज्येष्ठ सल्लागार संजय ओरपे व राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी समारोप सत्रात सहकार भारती महाराष्ट्राच्या पुढील 3 वर्षांसाठीच्या प्रदेश कार्यकारीणीची निवड होणार असून यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *