सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी सुरू

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

Counting of votes begins for by-elections to seven assembly constituencies in six states; BJP in front of four

सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी सुरू; भाजप चार आघाडीवर

अंधेरी पूर्व मतदार संघातून रुतुजा रमेश लटके ६० हजार मतांनी आघाडीवर

नवी दिल्ली : सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. शेवटच्या वृत्तापर्यंत भाजपचे उमेदवार चार जागांवर आघाडीवर होते.Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथ जागेवर अमन गिरी हे त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 34 हजार 298 मतांनी आघाडीवर आहेत. ओडिशाच्या धामनगर जागेवर सूर्यवंशी सूरज पाच हजार २६५ मतांनी आघाडीवर आहेत आणि हरियाणातील आदमपूरमध्ये भव्य बिश्नोई जवळपास सोळा हजार २८४ मतांनी आघाडीवर आहेत.

बिहारमध्ये गोपालगंज मतदारसंघातून भाजपच्या कुसुम देवी एक हजार ७९४ मतांनी आघाडीवर आहेत, तर मोकामामधून आरजेडी आघाडीवर आहे.

तेलंगणातील मुनोगोडे येथे टीआरएसचे उमेदवार के प्रभाकर रेड्डी दोन हजार १६९ मतांनी आघाडीवर आहेत, तर महाराष्ट्राच्या अंधेरी पूर्व येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार रुतुजा रमेश लटके ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघांसाठी गुरुवारी, ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक झाली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *