Turnover of Sangli Rajapuri and Parpeth Turmeric increased by Rs 192 crore
सांगलीत राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटी रुपयांनी वाढली
सांगली: सांगली मार्केट यार्डात यंदा राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्या वर्षभरात 1 हजार 899 कोटी 47 लाख 67 हजार रुपयांची खरेदी विक्री झाली.
सांगली मार्केट यार्डात हळदीच्या सौद्यासाठी देशभरातले व्यापारी येतात. कोरोनामुळे हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण 2021-22 यावर्षात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती, तरीही हळदीची उलाढाल वाढली आहे.
यावर्षात राजापुरी हळदीची आवक 19 लाख 13 हजार 435 क्विंटल झाली. त्यात 1 हजार 709 कोटी 65 लाख 41 हजार 725 रुपयांची उलाढाल झाली.
राजापुरी हळदीची आवक 2 लाख 93 हजार 314 क्विंटलनं वाढली. त्यामुळे 105 कोटी 73 लाख 43 हजार 825 रुपयांनी उलाढाल वाढल्याचं दिसत आहे.
परपेठ हळदीची आवक 1 कोटी 80 लाख 938 क्विंटल वाढली. त्यामुळे 86 कोटी 62 लाख 19 हजार 180 रुपयांनी खरेदी-विक्री वाढली.
Hadapsar News Bureau.