सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ १ जुलैला

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The 122nd Graduation Ceremony of Savitribai Phule Pune University on 1st July

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ १ जुलैला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवीप्रदान समारंभ दिनांक १ जुलै २०२३ रोजी होणार संपन्न

३० विद्यार्थी आणि ४० विद्यार्थिनी असे एकूण ७० विध्यार्थ्यांना मा. कुलपती यांच्या हस्ते १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवीप्रदान समारंभ दिनांक १ जुलै २०२३ रोजी संपन्न होणारआहे. विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहात दुपारी २. ३० वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे.Savitribai Phule Pune University

सदर पदवीप्रदान सोहळा मा. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच मा. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य, महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री,पुणे हे सन्माननीय अतिथी म्हणून तर भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी श्रीमती चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विद्यापीठ अधिकार मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्यासह विध्यार्थी उपस्थित राहणार आहे.

एप्रिल/मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण १,२१,२८१ विध्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये पदवीचे ९३९८३, पदव्युत्तर पदवी २६४५४, पीएचडी ४३८, एमफिलचे ११ असे एकूण १,२१,२८१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

३० विद्यार्थी आणि ४० विद्यार्थिनी असे एकूण ७० विध्यार्थ्यांना मा. कुलपती यांच्या हस्ते १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. सन २०२१- २२ मध्ये शैक्षणिक, खेळ व इतर कलागुणांमध्ये वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरी करणारी प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी , पुणे ची विद्यार्थिनी अदिती कालीदास भोईटे हिला भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाने सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सुवर्णपदक प्राप्त विध्यार्थ्यांना समारंभात तर उर्वरित विध्यार्थ्यांना टपालाद्वारे पदवी त्यांच्या पत्यावर पाठविण्यात येईल.


हे ही अवश्य वाचा

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ


Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *