Greetings to Annabhau Sathe at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
जयकर ज्ञानस्रोत केंद्रामार्फत ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रतिभावंत लेखक आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्ताने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अभिवादन केले. माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा, चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जयकर ज्ञानस्रोत केंद्रामार्फत दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या ग्रंथप्रदर्शनाचे यावेळी उदघाटनही कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
जयकर ज्ञानस्रोत केंद्रामार्फत ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन
जयकर ज्ञानस्रोत केंद्रात हे ग्रंथप्रदर्शन दिनांक १८ जुलै ते २० जुलै २०२३ असे तीन दिवस खुले राहणार आहे. ३० पेक्षा जास्त विक्रेते आणि प्रकाशक यांनी त्यांचे नवीन पुस्तक संग्रह या दालनात प्रदर्शित केले आहे. शैक्षणिक विभागप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले असून यास आवर्जून भेट द्यावी असे जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना आणि ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटनाच्या प्रसंगी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, अध्यासनप्रमुख डॉ. सुनिल भंडगे, संचालक डॉ. विलास आढाव तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन”