Online Application for Degree Certificate of Savitribai Phule Pune University has started
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकताच १२२ वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया १ ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत असून पदवी प्राप्त करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागातर्फे करण्यात येत आहे.
फक्त ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ व जून / जुलै २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना convocation.unipune.ac.in विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विध्यार्थी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. तर त्यांना १ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.
ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ व जून / जुलै २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेले विध्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
2 Comments on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु”