‘Biology Beyond Boundaries’ conference at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ परिषद
आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार
परिषदेचे उद्धाटन सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख व उद्योजक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते होणार
डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन उपस्थित राहणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २९ ते ३१ जानेवारी दरम्यान वैज्ञानिकांची मांदियाळी जमणार आहे. विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलजी विभागातर्फे ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्धाटन सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख व उद्योजक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ). सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ). पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ). विजय खरे, बायोटेक्नॉलजी विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित राहतील.
विद्यापीठाचा बायोटेक्नॉलजी विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
माइटोकॉन्ड्रिया, सेल डेथ आणि मानवी रोग, मानवी रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. ज्यात प्रा. एड्रियन हिल (कोविशील्ड लस शोधक, ऑक्सफर्ड विद्यापीठ), डॉ. पॅट्रिक डफी (मलेरिया लस शोधक), डॉ. एलिझाबेथ उंगेर (प्रमुख, सीडीसी, यूएसए) यांसारखे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर डॉ. रॉबर्ट सेडर (NIAAID, NIH, बेथेस्डा यूएसए), माईक मॅकक्यून (बिल गेट्स फाऊंडेशन) इत्यादी प्रतिष्ठित जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित मान्यवर या परिषदेत सार्वजनिक आरोग्याविषयी चर्चा करणार आहेत. ही परिषद विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात होणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ परिषद”