Savitribai Phule honor ceremony organized
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभागामार्फत सावित्रीबाई फुले सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुणे : भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन कार्यकत्तृत्वाने ठसा उमटवून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ५ महिलांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये ५ कर्तुत्वान महिलांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये ज्येष्ठ भारूड सम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी, , नाशिक, योगअभ्यासिका श्रीमती प्रज्ञा पाटील, पुणे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सकीना बेदी, पुणे, श्रीमती मनीषा तोकले, बीड, श्रीमती वैशाली गांधी, अहमदनगर या महिलांचा समावेश आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रू. ११,०००/- धनादेश, विद्यापीठाची शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा प्रा.डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली, प्रा.डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व प्रा.डॉ. विजय खरे, कुलसचिव साबित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
ह्या गौरवमूर्तींची निवड करण्याकरिता निवडसमिती सदस्य म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप, विद्यापीठाच्या विधी विभागप्रमुख डॉ. ज्योती भाकरे, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाच संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी कामकाज पाहिले.
हा सन्मान सोहळा दि. १३ मार्च, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात संपन्न होणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
One Comment on “सावित्रीबाई फुले सन्मान सोहळ्याचे आयोजन”