सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क चालवणाऱ्या व्यावसायिकाला अटक

CGST Bhiwandi Commissionerate arrests businessman for running fake ITC network.

सीजीएसटी  भिवंडी आयुक्तालयाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क चालवणाऱ्या व्यावसायिकाला अटक केली.

मुंबई: सीजीएसटी मुंबई विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट चालवणाऱ्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे.Goods & Service Tax

मुंबई सीजीएसटी विभागाच्या  केंद्रीय गुप्तचर विभागाकडून  मिळालेल्या माहितीच्या आधारे  कारवाई करून, अधिकाऱ्यांनी ठाणे, भिवंडी, रायगड आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी समन्वयित कारवाई हाती घेतली  आणि 63 कोटींपेक्षा जास्त बनावट  बिले तयार करून  बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट देऊन  11.4 कोटी रुपयांची जीएसटी चोरी करणाऱ्या रॅकेटचा शोध लावला.

मे.आदर्श स्क्रॅप ट्रेडर्सच्या भिवंडी येथील कंपनी परिसरात तपास करण्यात आला. ही कंपनी बनावट  बिलिंग आणि बनावट आयटीसी मिळवण्यात आणि दुसर्यांना देण्यात सहभागी होती.  अशा प्रकारे ते सरकारचा जीएसटी महसूल चुकवत  होते. 

सुरुवातीच्या तपासात असे समोर आले आहे की कंपनीने  मालाचा प्रत्यक्ष पुरवठा किंवा पावती न देता 11.4 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता. कंपनीच्या  मालकाने बोगस बिलिंग आणि बनावट आयटीसी रॅकेट चालवल्याचे  कबूल केले.

त्याला सीजीएसटी  कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत 21.01.2022 रोजी अटक करण्यात आली आणि आज 22.1.2022 रोजी फोर्ट, मुंबई इथल्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर  हजर करण्यात आले. त्यांनी  आरोपीला  4.02.2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *