सीमा रस्ते संघटना आपल्या रस्त्यांचे रस्ता सुरक्षा परीक्षण करणार.
ठळक मुद्दे :
- रस्ते सुरक्षित करून अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी सीमा रस्ते संघटना त्यांच्या विद्यमान रस्त्यांचे रस्ता सुरक्षा परीक्षण करणार
- नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेसंदर्भात जागरूकता वाढविण्यासाठी 75 दिवस देशव्यापी मोटारसायकल मोहिम
सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) बांधलेले रस्ते केवळ सशस्त्र दल आणि निमलष्करी दलेच वापरत नाहीत तर देशभरातील पर्यटक आणि साहसी पर्यटक मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांवरून प्रवास करतात. सर्व प्रकारच्या हवामानात, कोणत्याही उंचीवर आणि कोणत्याही ऋतूमध्ये रहदारीचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये, अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि विविध पद्धतीं आणल्या जात आहेत.
वाढलेली वाहतूक आणि अतिवेगाने वेगाने वाहन चालवल्याच्या घटनांमुळे वाहतूक संबंधित अपघातांमध्ये दुर्दैवी वाढ होते आहे. सीमा रस्ते संघटनेने आता त्यांनी बांधलेले रस्ते आणि पुलांची अपघात क्षमता कमी करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे आणि विद्यमान रस्ते आणि पुलांचे परीक्षण करण्यासाठी व्यापक कार्यवाहीला सुरुवात केली आहे. बहुतांश उपक्रम यापूर्वीच हाती घेण्यात आले असून नवी दिल्लीतील सीमा रस्ते संघटनेच्या मुख्यालयात करण्यात आलेली रस्ता सुरक्षा जागरूकता उत्कृष्टता केंद्राची (CoERSA) स्थापना सर्वात महत्वाची आहे.हे केंद्र सर्वप्रकारची धोरणे तयार करण्यासाठी आणि घोषित करण्यासाठी नोडल संस्था असेल आणि संघटनेच्या सर्व प्रकल्पांमध्ये रस्ता सुरक्षेसाठी मानक कार्यान्वयन प्रक्रिया निश्चित करेल. सध्याच्या रस्त्यांचे टप्प्यानुसार अंतर्गत परीक्षण सुरू करून रस्ता सुरक्षा परिक्षणाची कार्यवाही क्रमाक्रमाने मुख्य तज्ञांद्वारे सुरु करण्याचे सीमा रस्ते संघटनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे संभाव्य अपघात प्रवण स्थळे ओळखून निश्चित करण्यासह रस्त्याची भौमितिक अनियमितता आणि रस्त्याच्या कडेची संकेतचिन्हे आणि रस्त्यालगतची अन्य सामग्री इत्यादीमध्ये सुधारणा प्रस्तावित होईल
या सोबतच समाजमाध्यमांचा वापर करून रस्ता वापरकर्त्यांची जागरूकता वाढवणे, हा सार्वजनिक संपर्क वाढविण्याचा मजबूत प्रयत्न असेल.लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी 75 दिवसांची देशव्यापी मोटारसायकल मोहीमही हाती घेण्यात येत आहे, ही मोहीम 14 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रीय राजधानीमधील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरु होईल.
रस्ता सुरक्षेसाठी महिनाभराची, प्रारंभिक अंतर्गत परीक्षण कार्यवाही 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या राज्यांमधील सीमा रस्ते संघटनेच्या प्रकल्पांचा समावेश आहे.