Application for admission in military boys and girls hostels are invited by July 15
सैनिकी मुला- मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी सैनिकी मुलांचे, मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक युद्धविधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्याच्या वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेसंबंधित माहिती पत्रक व प्रवेश अर्ज पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे २१ जूनपासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी संबंधित वसतिगृहामध्ये उपस्थित राहून सेवानिवृत्तीबाबतचे पुस्तक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र, विधवा ओळखपत्र, ईसीएचएस ओळखपत्र आदी सैन्यातील कागदपत्रे सोबत आणावीत.
विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्यास वसतिगृह प्रवेश अर्ज जमा करण्याची तारीख वाढवून देण्यात येणार आहे, असेही कळवण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com