सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी.

Guidelines for home Quarantine of corona patients with mild symptoms and no symptoms.

सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी.Health and Family Welfare Ministry

दिल्ली : सौम्य लक्षणं असलेल्या आणि लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत.

त्यानुसार बाधित रुग्णानं स्वतःला घरातल्या इतर सदस्यांपासून वृद्धांपासून तसंच इतर आजार असलेल्या रुग्णांपासून वेगळं ठेवावं. रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेऊन रुग्णाच्या आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तिमध्ये काही गंभीर लक्षणं आढळून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.

संसर्गाच्या लक्षणांमध्ये ३ दिवसांपेक्षा जास्त काळ १०० अंशांपेक्षा जास्त ताप, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, थकवा आदी लक्षणांचा समावेश आहे. गृह विलगीकरणाच्या काळातही रुग्णाला डॉक्टरांच्या संपर्कात राहून, त्रास वाढल्यास त्यांच्या लक्षात आणून देणं आवश्यक आहे.

जिल्हा प्रशासनालाही गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर सतत आणि दैनंदिन देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *