स्मृती मंधाना ठरली २०२१ ची आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू.

India’s opening batter Smriti Mandhana named ICC Women’s Cricketer of 2021.

स्मृती मंधाना ठरली २०२१ ची आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2021 मधली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून भारतीय संघातली सलामीची फलंदाज स्मृती मंधानाचं नाव घोषित केलं आहे.India's opening batter Smriti Mandhana named ICC Women's Cricketer of 2021.

राशेल हेयू – फ्लिंच मानचिन्हाच्या स्वरुपात मिळणारा हा पुरस्कार स्मृतीने 2018 मध्येही मिळवला होता.

डावखुऱ्या सलामीवीराने इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉन्ट, दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली आणि आयर्लंडच्या गॅबी लुईस यांना हरवून हा बहुमान पटकावला. स्मृती ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीनंतर हा बहुमान पटकावणारी दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय संघातही मंधानाचा समावेश होता.

टी ट्वेंटी सामन्यातल्या सर्वोत्कृष्ट संघातही आयसीसीने स्मृतीचा समावेश केला आहे. स्मृती मंधानाने 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे मिळून 855 धावा काढल्या असून त्यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

गेलं वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघासाठी फारसं चांगलं नसलं तरी स्मृती मंधानाची कामगिरी नेत्रदीपक झाली होती. दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या एका दिवसाच्या सामन्यात 80 तर टी 20 सामन्यात 48 धावा नाबाद फटकावून तिनं संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रोलियामधे दिवस – रात्र कसोटी सामना प्रथमच खेळतानाची तिची शतकी खेळी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातली 78 धावांची झुंजार खेळी संस्मरणीय ठरली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *