स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये, पुणे शहराला महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन.
स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत भारत सरकार आवासन और शहरी कार्य मंत्रालय यांच्यामार्फत दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी स्वच्छ सर्वेक्षण२०२१, सफाई मित्र सुरक्षा पुरस्कार व कचरामुक्त शहर पुरस्कार वितरण समारोह आयोजित करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला 4320 शहरांमध्ये १० क्रमांकाचे 10 ते 40 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ५ क्रमांकाचे व महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
याकरिता माननीय सचिव MOHUA यांचे हस्ते पुणे शहराला सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे best sustainable big city मध्ये प्रथम क्रमांक व GFC अंतर्गत थ्री स्टार मानांकनाने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार पुण्यनगरीचे माननीय महापौर श्री मुरलीधर मोहोळ माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार श्री अजित देशमुख उपायुक्त पुणे महानगरपालिका श्रीमती आशा राऊत उपायुक्त स्वच्छ सर्वेक्षण व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर केतकी घाटगे यांनी स्वीकारला.
कोविड काळामध्ये पुणे प्रशासन सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वच्छ भारत पुणे महानगरपालिका नागरिक स्वयंसेवी संस्था यांचे सांगीतिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भाव यामुळे हा सन्मान प्राप्त झाल्याचे माननीय महापालिका आयुक्त यांनी सांगितले. यापुढील काळात लोकसहभागातून उत्तरोत्तर प्रयत्न करणार असल्याचे मत माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी, माननीय आयुक्त,स्वच्छ संस्था Citizen forums. Punekar यांचे मोलाचे सहभाग मिळाले असे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले. या पुरस्काराचे श्रेय मुख्यतः पुणेकर नागरिकांचे असून त्यांच्या सहभागाने आगामी काळात देखील अनेक समाज समाज उपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येतील असे मत माननीय महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.