स्वदेशात विकसित अद्ययावत अभियांत्रिकी वाहन भारतीय लष्करात समाविष्ट.
आज पुणे येथे लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात स्वदेशी बनावटीच्या अद्ययावत आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल या विकसित अद्ययावत अभियांत्रिकी वाहनाचा पहिला संच भारतीय लष्कराच्या अभियंता कॉर्प्समध्ये दाखल करण्यात आला.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे या प्रणालीची रचना केली गेली आहे आणि मेडक आयुध निर्मिती कारखाना आणि पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने त्याची निर्मिती केली आहे. गेल्या एक वर्षापासून कोविड महामारीमुळे विविध निर्बंध असूनही भारतीय लष्कराला वाहनाचा पुरवठा वेळेवर सुरू आहे.
हे वाहन अभियंता कार्ये पार पाडण्यासाठी आणि फोर्स कमांडर्सना रिअल टाइम सद्यस्थिती प्रदान करण्याच्या क्षमतेसह पाण्यातील अडथळे आणि दलदलीचे भाग शोधून काढण्यास सक्षम आहे. ही प्रणाली भारतीय सैन्याच्या विद्यमान अभियंता सर्वेक्षण क्षमता वाढवेल आणि भविष्यातील संघर्षांमध्ये यांत्रिक कार्यान्वयनाच्या समर्थनासाठी एक प्रमुख गेम चेंजर असेल.