हडपसर इन्फो मिडिया – आठवड्यातील महत्वाच्या बातम्या.

Hadapsar Info Media

आठवड्यातील महत्वाच्या बातम्या.

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियामांमध्ये करण्यात यावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियामांमध्ये करण्यात यावा.

गुळवेल वापरण्यासाठी सुरक्षित आहे: आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालयाने अलिकडेच समाज माध्यम आणि काही वैज्ञानिक नियतकालिकां मध्ये गुडुची अर्थात गुळवेलीच्या (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापराच्या सुरक्षिततेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेतली आहे.

गुडुची अर्थात गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापरण्यास सुरक्षित आहे मात्र  टिनोस्पोरा क्रिस्पा सारख्या तशाच दिसणाऱ्या काही वनस्पती हानिकारक असू शकतात हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे. गुडुची ही एक लोकप्रिय ज्ञात वनौषधी आहे, जी गुळवेळ (गिलोय) म्हणून परिचित आहे आणि आयुष प्रणालींमध्ये दीर्घकाळापासून उपचारांमध्ये ती वापरली जात आहे.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

गुळवेल वापरण्यासाठी सुरक्षित आहे: आयुष मंत्रालय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी सेवेद्वारे 1.3 कोटी लोकांनी आरोग्यविषयक सल्ला सुविधेचा लाभ घेतला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई-संजीवनी उपक्रमाने आज आरोग्यविषयक 1 कोटी 30 लाख सल्ले देण्याचा टप्पा पूर्ण केला. ई-संजीवनी हा भारत सरकारचा आरोग्यविषयक सल्ला उपलब्ध करून देणारा  टेलीमेडिसिन उपक्रम आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील डिजिटल मंच म्हणून हा उपक्रम हळूहळू भारतीय आरोग्य सेवा वितरण क्षेत्राला समांतर आरोग्यविषयक सेवा सुविधा म्हणून आकाराला येत आहे.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

ई-संजीवनी सेवेद्वारे 1.3 कोटी लोकांनी आरोग्यविषयक सल्ला सुविधेचा लाभ घेतला.

 

इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर डिजी लॉकरबरोबर जोडण्यात आली.

ठळक वैशिष्ट्ये :

  • 23 लाखांहून अधिक संरक्षण दलाच्या निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळेल
  • संरक्षण दलातील निवृत्तीवेतनधारकांचे राहणीमान उंचावेल
  • निवृत्तीवेतनधारक त्वरित पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळवू शकतील
बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर डिजी लॉकरबरोबर जोडण्यात आली.

 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून आयुष्मान भारत पीएम- जनऔषधी योजनेच्या आरोग्य लाभ पॅकेजमध्ये सुधारणा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (एबी पीएम- जेएवाय) या योजनेची अंमलबजावणी करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्य लाभ पॅकेजमध्ये सुधारणा केल्या आहेत.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

आयुष्मान भारत पीएम- जनऔषधी योजनेच्या आरोग्य लाभ पॅकेजमध्ये सुधारणा.

प्रसार भारती नेटवर्कवर टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे प्रसारण.

टी 20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी उलट गणना सुरू झाली असून प्रसार भारती नेटवर्कवर या स्पर्धेचे सामने थेट प्रसारित केले जाणार आहेत. भारतातील क्रिकेटप्रति आवड लक्षात घेऊन दूरदर्शन आणि आकाशवाणीने सामन्यांचे थेट प्रसारण, रेडिओ समालोचन  आणि विशेष कार्यक्रमांसह मेगा कव्हरेजचे नियोजन केले आहे.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

प्रसार भारती नेटवर्कवर टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे प्रसारण.

 

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय चार्टर्ड विमानांनी भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांना 15 ऑक्टोबरपासून नवे पर्यटन व्हिसा मंजूर करण्यास सुरुवात करणार.

कोविड-19 महामारीच्या संकटामुळे, गेल्या वर्षभरापासून परदेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी प्रवाशांना व्हिसा देण्याची काम स्थगित ठेवण्यात आले होते. कोविड-19 महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक निर्बंध घातले होते. कोविड-19ग्रस्त परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असल्याचा विचार करून नंतरच्या काळात परदेशी प्रवाशांना पर्यटक व्हिसाखेरीज इतर कोणत्याही प्रकारच्या भारतीय व्हिसाचा वापर करून भारतात प्रवेश आणि निवासाला परवानगी देण्यात आली.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

चार्टर्ड विमानांनी भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांना 15 ऑक्टो.पासून नवे पर्यटन व्हिसा

 

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदविका व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) /QS (Quacquarelli Symonds) Ranking २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा २० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता online पध्दतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावरून सुरु करण्यात आलेली आहे.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

रुग्णांची जगण्याची उमेद वाढवणाऱ्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सुधा मूर्ती यांचा गौरव.

मुंबई  : आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या ‘आशा’ धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दारदेखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या ‘आशा’ निवास धर्मशाळेच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर येथील ‘आशा’ धर्मशाळेचे उद्घाटन.

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी केंद्र शासनाने विकसीत केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत केंद्र शासनाचा ६० तर राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादकांचे ब्रँन्डीग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरणावर भर देणे हा योजनेचा उद्देश आहे.

बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन.

 

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *