हडपसर जवळील चार वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये सोई सुविधांचा अभाव.

Keshavnagar

हडपसर जवळील चार वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये सोई सुविधांचा अभाव. Keshavnagar

पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही आता चालू होणार आहे. पण चारवर्षा पूर्वी महापालिकेत समावेश होऊनही गावामध्ये सोई सुविधांचा अभाव आहे. Keshvnagar, Mundhva, Pune

कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा अशा सुविधां अजूनही झालेल्या नाही.
मुंढव्यातील केशवनगर हे गाव पुणे महानगर पालिकेत जाऊन चार वर्षे झाली तरी पावसाळ्यात केशवनगर ओढा पुलावर कचरा व पाणी साठत आहे, त्यामुळे सदर पुलावर फुटपाथ नसले मुळे नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे केशवनगर चा विकास न होता केशवनगरला विविध समस्या ने ग्रासलेला आहे केशवनगर भागात ओढा पुलावर कुंभार वाडा बुद्ध विहार आॅक्सफर्ड रिव्हर्स ह्यु गुरुकृपा सोसायटी व आॅरबिस शाळा रस्ता शंकर नगर महागणेशनगरी सोसायटी जवळ शिक्षक सोसायटी जवळ कचरा चे ढीग लागले असुन पावसामुळे दुर्गंधी पसरली आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या करोनापेक्षा डेंगू व मलेरिया व स्वाईन फ्लूची साथ येण्याची वाट न पाहता पुणे महानगर पालिका प्रशासनाने सदरील कचरा हा रोजच्या रोज उचलावा नागरिकांच्या आरोग्याशी खेळु नये कचरा लवकरात लवकर हलवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

हिच परिस्थिती फुरसुंगी , देवीचीउरुळी या हडपसर जवळील गावामध्ये आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, याचा अभाव आहे. भेकराईनगर, ढमाळवाडी मध्ये अद्याप पाणीपुरवठा टँकर द्वारे होतो. एकूणच या गावातील परिस्थिती मध्ये महापालिकेत समावेश होऊनहीबदल काही झाली नाही.

लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते , महापालिका प्रशासन यांनी या समस्या मध्ये लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *