हवामान अंदाजाची अचूकता वाढवणाऱ्या मुंबईतल्या दुसऱ्या डॉपलर रडारचं लोकार्पण.

Dedication of the second Doppler radar in Mumbai to increase the accuracy of weather forecasts.

हवामान अंदाजाची अचूकता वाढवणाऱ्या मुंबईतल्या दुसऱ्या डॉपलर रडारचं लोकार्पण.Dedication of the second Doppler radar in Mumbai to increase the accuracy of weather forecasts.

मुंबई: केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईतल्या वेरावली इथं सी बॅण्ड डॉपलर हवामान रडारचं दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं. भारतीय हवामान विभागाच्या १४७ व्या स्थापना दिनानिमित्त या प्रणालीचं लोकार्पण झालं.
ही देशी बनावटीची रडार प्रणाली हवामान विभाग आणि इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था यांनी विकसित केली आहे.

हवामानाचं अधिक अचूक पूर्वानुमान देणारं हे मुंबईतलं दुसरं रडार आहे. या प्रणालीमुळे पावसाचा अंदाज अधिक चांगला देता येणार असून हवामानाचे इशारे देण्याची हवामान विभागाची क्षमता वाढली आहे.

मुंबईच्या ४५० किलोमीटर परिघात त्यामुळे देखरेख ठेवता येणं शक्य झालं आहे. वादळं, विजेचा कडकडाट, धुकं आणि मुसळधार पावसाचं पूर्वानुमान या प्रणालीमुळे आता अधिक लवकर मिळू शकेल. यात तीन-तीन तासांनी हवामान अंदाज देता येणार आहेत.

सामान्य माणसाला हवामानानुसार योग्य निर्णय घेता यावेत, यासाठी भारतीय हवामान विभागाची सेवा अधिक चांगली व्हावी यासाठी विभागाला जागतिक दर्जाची संस्था बनवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *