हवामान घटकांच्या माहितीची महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष वेळेच्या माहितीची नोंद.

हवामान घटकांच्या माहितीची महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष वेळेच्या माहितीची नोंद.

राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणे व हवामान घटकांची आकडेवारी संकलित करणेसाठी; स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांचे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून महावेध प्रकल्प राबविणेत येत आहे. प्रकल्पांतर्गत, सद्यस्थितीत उभारलेल्या २ हजार १०८ केंद्रातून तापमान,पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकांच्या प्रत्यक्ष वेळेच्या माहितीची नोंद होत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

महावेध प्रकल्पांतर्गत; स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविलेली केंद्र स्थापनेपासून आज घडीला ३६५ दिवसापुर्वीची कमाल व किमान तापमान, सकाळी ८.३० वाजता व सायंकाळी ५.३० वाजता ची सापेक्ष आद्रता, वाऱ्याचा झोत व पर्जन्यमान या हवामान घटकांची दैनंदिन माहिती महावेध पोर्टल वर उपलब्ध करून देणेत आलेली आहे.

ही माहिती http://services.mahavedh.com/mahavedh_portal/ या संकेत स्थळावर Historical data या मथळ्याखाली जिल्हा, तालुका, मंडळ व ३० दिवसांचा अपेक्षित कालावधी निवडून पाहता येईल; असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *