१ली ते ५वी पर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस- आरोग्यमंत्री

State Government intends to start classes from 1st to 5th from 1st February – Health Minister.

१ली ते ५वी पर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस- आरोग्यमंत्री.

जालना: विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

दिली.

जालना इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

ब्रिटन आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांनी, ‘आता आपल्याला कोरोना बरोबर राहायचं आहे’ असं म्हटलं आहे. त्यामुळे या देशांपासून बोध घेऊन आगामी काळात कृती दल आणि केंद्र सरकारच्या सूचनांचं पालन केलं जाईल असंही टोपे यावेळी म्हणाले.

राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्याव असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याची कबुली देत, कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्यानं उद्योजकांचं नुकसान होत आहे, तसंच महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचं टोपे म्हणाले.

नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घेऊन कोरोना नियमांचं पालन केल्यास आपण लवकर कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *