१९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय.
दुबई : दुबई इथं झालेल्या १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेवर ९ गडी राखून मात करत भारतानं विजेतेपद पटकावलं. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची पडझड झाली.
पावसानं व्यत्यय आणल्यामुळे हा सामना ३८ षटकांचा खेळवला गेला. निर्धारीत ३८ षटकांच्या खेळात श्रीलंकेनं ९ बाद १०६ धावा केल्या. भारताच्या विकी ओत्सवाल यानं ३, कौशल तांबे यानं २ तर राजवर्धन, रवी कुमार आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी भारतासमोर ३८ षटकांमध्ये १०२ धावांचं आव्हान ठेवलं गेलं. भारतानं २१ षटकं ३ चेंडुंमध्येच केवळ एका गड्याच्या मोबदल्यात १०४ धावा करत विजयी लक्ष्य गाठलं.