१९ वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत सुपर लीग फेरीसाठी पात्र.

ICC U-19 World Cup: India qualifies for the Super League phase with 174 runs against Ireland.

१९ वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत सुपर लीग फेरीसाठी पात्र.

त्रिनिदाद: ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत, सुपर लीग टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी भारताने त्रिनिदादच्या तारुबा येथे गट ब सामन्यात आयर्लंडवर 174 धावांनी मोठा विजय नोंदवला.ICC U-19 World Cup: India qualify for Super League phase with 174 runs against Ireland

प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 बाद 307 धावा केल्या, सलामीवीर आंक्रिश रघुवंशी यांनी 79 आणि हरनूर सिंगने 88 धावा केल्या. आयर्लंडकडून मुझमिल शेरझादने तीन बळी घेतले.

मात्र विजयासाठी ३०८ धावांचा पाठलाग करतांना आयर्लंडचा संपूर्ण संघ ३९ षटकांत १३३ धावा करून माघारी परतला.   गर्व सांगवान, अनिश्‍वर गौतम आणि कौशल तांबे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. या विजयामुळे

भारत ब गटात ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गटसाखळी फेरीत येत्या शनिवारी भारताची लढत युगांडासोबत होणार आहे.

भारताचा कर्णधार यश धुल आणि इतर पाच सहकारी कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यामुळे निशांत सिंधूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या विजयामुळे भारत सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *