१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा ३२६ धावांनी विजय.

India wins by 326 runs in the Under-19 Cricket World Cup.

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा ३२६ धावांनी विजय.

वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल ब गटात झालेल्या सामन्यात भारतानं युगांडाचा ३२६ धावांनी पराभव केला. या विजयामुळेIndia wins by 326 runs in the Under-19 Cricket World Cup. भारतानं ब गटात अव्वल स्थान पटकावलं आहे.

युगांडानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर भारतानं निर्धारित ५० षटकांमध्ये ५ गडी बाद ४०५ धावा केल्या. भारताच्या वतीनं सलामीवीर अंगक्रीश यानं १४४ तर राज बावा यानं नाबाद १६२ धावा केल्या.

त्यानंतर विजयासाठी ४०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना युगांडाचा संपूर्ण संघ केवळ १९ षटकं आणि ४ चेंडूंमध्ये अवघ्या ७९ धावांतच माघारी परतला. भारताच्या वतीनं कर्णधार निशांत सिंधू यानं ४ गडी बाद केले.

आता येत्या २९ जानेवारीला स्पर्धेच्या सुपरलीग गटात उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा सामना बांग्लादेशासोबत होणार आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *