The number of cured patients in the state is almost double that of the newly diagnosed Covid 19 patients yesterday.
राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या जवळजवळ दुप्पट.
मुंबई : राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळजवळ दुप्पट होती. राज्यात काल २७ हजार ९७१ नव्या रुगांची नोंद झाली, ५० हजार १४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ६१ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ७६ लाख ८३ हजार ५२५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७२ लाख ९२ हजार ७९१ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४२ हजार ५२२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २ लाख ४४ हजार ३४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ९१ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ८५ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ४४ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातले आहेत, मुंबईत ३९ तर पुणे ग्रामीण आणि अकोला जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला.
राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार १२५ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी १ हजार ६७४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.