Organizing various educational activities by the Education Department of the State Government on the occasion of Mahatma Gandhi’s death anniversary.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन.
मुंबई : ३० जानेवारी या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे. इयत्तांनुसार विद्यार्थ्यांची गटनिहाय विभागणी करून त्यांना स्वच्छता, स्वावलंबन, सत्कृत्य, हस्तउद्योग असे उपक्रम दिले गेले आहेत.
या उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण या विषयावर परिसंवाद, तर अहिंसा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, तसंच महात्मा गांधी यांचं जीवन आणि त्यांच्या विचारांवरच्या व्याख्यानंचही आयोजन केलं गेलं आहे.
महात्मा गांधी यांनी नयी तालीमच्या स्वरुपात देशाला शैक्षणिक प्रयोगाची मोठी देणगी दिली होती, याअंतर्गत मन – मनगट आणि मस्तक याचा विचार त्यांनी मांडला होता. हाच विचार शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा या उद्देशानं हे उपक्रम आयोजित केले आहेत.