Online admission for Kindergarten to VIII in Pune Municipal Schools.  

Online admission for Kindergarten to VIII in Pune Municipal Schools.  

In the situation created due to the communicable disease Covid-19, the government has directed that the academic year 2021-22 should be started online from 14th June 2021. But considering the current situation, it is difficult for parents or students to go directly to the Pune Municipal School and get admission. In such a situation, an online admission process has been started by the Primary Education Department of Pune Municipal Corporation. A total of 273 Marathi, Urdu, English and Kannada medium primary schools have been started in Pune city on behalf of Pune Municipal Corporation. In all these schools, parents will now be able to get admission online for any of these classes from Kindergarten to VIII. An online system has been created for this. The system can be accessed through the link https://rb.gy/duaxe9.

 

After switching to the online system, parents / students should select the area in which they reside in the ward office area. Then select the field office under which the ward office is required, then the list of schools coming under the respective field office will appear. You will have to select the school in which you want admission and fill in the required information. The headmaster / teacher of the school you have chosen will contact you using the contact number you provided to confirm your child’s admission. This system will enable parents to get free admission in municipal schools for their children.

 

 E-learning facility has been provided in all the schools of Pune Municipal Corporation. Through that students are taught online. Also, educational videos, e-books, homework, etc. of all subjects of class I to VIII have been provided free of cost through Edumitra app so that students do not suffer academic loss in the given situation. Free textbooks are also provided to all the students and the required amount for educational materials (uniforms, shoes, school bags, notebooks etc.) is credited to the account of the student / parent under the DBT scheme. The administration is appealing for admission in the municipal schools through the link https://rb.gy/duaxe9 in the Pune Municipal School which is equipped with computer training, well equipped library, laboratory and school buildings etc.

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी ते आठवी साठी ऑनलाइन प्रवेश .                                    Pune Municipal Corporation

विड-१९ या साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सन २०२१- २२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दिनांक १४ जून २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु सद्य परिस्थिती पाहता पालकांना अथवा विद्यार्थ्यांना पुणे  महानगरपालिकेच्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे अडचणीचे  आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे शहरात मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या एकूण २७३ प्राथमिक शाळा सुरु आहेत. या सर्व शाळांमध्ये पालकांना आता बालवाडी ते आठवी यापैकी कोणत्याही वर्गासाठी online पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी एक online प्रणाली तयार करण्यात आली आहे. https://rb.gy/duaxe9 या लिंकद्वारे सदर प्रणालीवर जाता येईल.

ऑनलाईन प्रणालीवर गेल्या नंतर पालक/ विद्यार्थी यांनी आपण ज्या क्षेत्रीय कार्यालय (वॉर्ड ऑफिस) परिसरात वास्तव्यास आहेत तो विभाग निवडावा. त्यानंतर ज्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत (वॉर्ड ऑफिस) प्रवेश हवा आहे, ते क्षेत्रीय कार्यालय निवडावे. पुढे संबंधित क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळांची यादी दिसेल. आपणास ज्या शाळेत प्रवेश हवा आहे त्या शाळेची निवड करून पुढील आवश्यक माहिती भरावी लागणार आहे. आपण ज्या शाळेची निवड केली आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक / शिक्षक आपण दिलेल्या संपर्क क्रमांकाद्वारे आपल्याशी संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करतील. सदर  प्रणालीमुळे पालकांना आपल्या पाल्यासाठी मनपा शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येईल.

 पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये इ-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना online अध्यापन केले जाते. तसेच प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून Edumitra app द्वारे पहिली ते आठवी या इयत्तांचे सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडीओ, इ-बुक्स, स्वाध्याय, इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात व शैक्षणिक साहित्य (गणवेश, बूट, दप्तर, वह्या इ. ) साठी आवश्यक रक्कम DBT योजने अंतर्गत विद्यार्थी / पालक यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. संगणक प्रशिक्षण, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा व शालेय इमारती इ. वैशिष्ठ्यपूर्ण बाबींनीयुक्त असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये https://rb.gy/duaxe9 या लिंकद्वारे मनपा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *