13 ऑक्टोबर रोजी ‘फेरफार’ अदालत’चे आयोजन : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

13 ऑक्टोबर रोजी ‘फेरफार’ अदालत’चे आयोजन

पुणे : आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 29 नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील क्षेत्रीय स्तरावर 13 ऑक्टोबर रोजी ‘फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून ‘फेरफार अदालती’ मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येऊन जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी ‘फेरफार’ नोंदी निर्गत करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मागील महिन्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या अदालतीमध्ये 2 हजार 941 इतक्या नोंदी निर्गत झाल्या आहेत.

जिल्ह्यात 10 ऑक्टोबर अखेर मुदत पूर्ण झालेल्या 13 हजार 94 नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार, व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करणेबाबत यापूर्वीही संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालती मध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत.
13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तीनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *