13 lakh 40 thousand cash seized from EPFO office.
EPFO च्या कार्यालयातून १३ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त.
मुंबई: मुंबईतल्या EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातल्या एका गैरव्यवहार प्रकरणी सुरु असलेल्या तपासात सीबीआयनं आज अंदाजे १३ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली.
मुंबईत कांदिवली इथल्या आपल्या कार्यालयात बनावट खात्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचा आरोप EPFO च्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयानं केला होता. तसंच या प्रकरणी कांदिवली इथल्या कार्यालयातले अधिकारी, कर्मचारी आणि काही अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित आरोपींनी ७१२ बोगस भविष्य निर्वाह निधी खात्यांच्या माध्यमातून केलेल्या गैरव्यवहारामुळे EPFO कॉर्पस फंडाचं अंदाजे १८ कोटी ९७ लाख ४३ हजार १५० रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणी सीबीआयनं मुंबईत ४ ठिकाणी राबवलेल्या तपास मोहिमेत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली तसंच कांदिवली इथल्या कार्यालयातल्या तत्कालीन दोन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानामधून रोकड जप्त केली.