Job Opportunity for Ex-Servicemen in 136 Infantry Battalion (TA) Eco, Mahar
माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी
१७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार
पुणे : माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
नोकरीसाठी ५ वर्षाच्या आतील सेवानिवृत्त असलेले व वय ५० वर्षापेक्षा कमी असलेले माजी सैनिक पात्र राहतील. सेवानिवृत्ती वेतन आदेश (पीपीओ), सेवा पुस्तिका (डिस्चार्ज बुक), सध्याचे ८ रंगीत पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ वर संपर्क साधावा.
पुणे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी”