1846 startups from all over the country participated in Maharashtra Startup Week.

One thousand 846 startups from all over the country participated in Maharashtra Startup Week.

The winning startups will get work orders of up to Rs 15 lakh, opportunities to work in various government departments in the state – Information Minister Skills Development Nawab Malik. 

320 on health, 252 on agriculture and education  238 new concepts submitted.

The Maharashtra Startup Week organized by the Maharashtra State Innovation Society under the Skill Development, Employment and Entrepreneurship Department of the State Government has received a good response and 1,846 startups across the country have registered for this week. 320 related to health, 252 related to agriculture, 238 related to education, new concepts have been submitted in various fields, informed the Minister of this department Nawab Malik. The aim of the week is to promote innovation among the youth and boost the entrepreneurial ecosystem in the country.

Minister Skills Development Nawab Malik.

Applications were invited for the 4th edition of Maharashtra Startup Week on the website www.msins.in from 12 May 2021. Startups across the country have applied in the fields of agriculture, education and skills, governance, healthcare, smart infrastructure, mobility, clean energy, waste management, water management. 1 thousand 846 applications have been received from 27 states and union territories and the highest number of 947 applications has been received from Maharashtra. These applications will now be scrutinized by experts and a list of the top 100 startups will be released in the last week of July 2021. The top 100 startups will have the opportunity to make presentations to investors, experts and senior government officials between August 9 and 13, 2021. With the Corona companion, all presentation sessions will take place online. The winning 24 startups will be ordered by the Government of Maharashtra to use their innovations in the relevant departments of the government at a cost of Rs 15 lakh each, said Minister Malik.  

Maharashtra has the highest number of 947 startups participating in this year’s Startup Week. After that, Karnataka 202, Delhi 87, Gujarat 54, Kerala 64, Madhya Pradesh 34, Tamil Nadu 89, Telangana 56, Uttar Pradesh 75, Rajasthan 37, Haryana 32 and a total of 1,846 startups from 27 different states and Union Territories have participated. The highest number of 322 applications from Maharashtra has come from Pune. Applications have been received from various districts like Mumbai 212, Mumbai Suburbs 70, Aurangabad 19, Kolhapur 13, Nagpur 42, Nashik 52, Palghar 13, Raigad 23, Thane 97. 

There are 320 applications for health, 252 for agriculture, 238 for education, 72 for governance, 94 for skills, 176 for smart infrastructure, 126 for transportation, 58 for sustainable green energy, 110 for solid waste management, 51 for water management and 349 for various other subjects. Through this week, the innovations of the youth will be given a big boost and encouragement, said Minister Shri. Malik said.  

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील एक हजार ८४६ स्टार्टअप्सचा सहभाग. 

विजेत्या स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश, राज्यातील विविध शासकीय खात्यांमध्ये काम करण्याची संधी – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती. 

आरोग्यविषयक ३२०,शेतीविषयक २५२ तर शिक्षणविषयक  २३८ नवसंकल्पना सादर. 

राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०,शेतीविषयक २५२,शिक्षणविषयक २३८ अशा, विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे हा या सप्ताह आयोजनामागील उद्देश असून सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.   

Minister Skills Development Nawab Malik.
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी 12 मे 2021 पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची तज्ञांकडून तपासणी केली जाईल आणि जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात टॉप 100 स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल. टॉप 100 स्टार्टअप्सना 9 ते 13 ऑगस्ट, 2021 दरम्यान गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. कोरोना साथीमुळे, सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाईन पद्धतीने होतील. यातील विजयी 24 स्टार्टअप्सना त्यांच्या नवसंकल्पना शासनाच्या संबंधीत विभागात वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात येतील, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले. 

यंदाच्या स्टार्टअप सप्ताहामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर कर्नाटक २०२, दिल्ली ८७, गुजरात ५४, केरळ ६४, मध्य प्रदेश ३४, तामिळनाडू ८९, तेलंगणा ५६, उत्तरप्रदेश ७५, राजस्थान ३७, हरयाणा ३२  याप्रमाणे विविध २७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील एकूण १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२२ अर्ज पुण्यातून आले आहेत. तर मुंबई २१२, मुंबई उपनगर ७०, औरंगाबाद १९, कोल्हापूर १३, नागपूर ४२, नाशिक ५२, पालघर १३, रायगड २३, ठाणे ९७ याप्रमाणे विविध जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत. 

आरोग्यविषयक ३२०, कृषिविषयक २५२, शिक्षणविषयक २३८, गव्हर्नन्सविषयक ७२, कौशल्यविषयक ९४, स्मार्ट पायाभूत सुविधाविषयक १७६,  परिवहनविषयक १२६, शाश्वत हरित ऊर्जाविषयक ५८, घनकचरा व्यवस्थापनविषयक ११०,पाणी व्यवस्थापनाबाबत ५१ तर इतर विविध विषयांबाबत ३४९याप्रमाणे नवसंकल्पना सादर करणाऱ्या स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी अर्ज केला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांच्या नवसंकल्पनांना मोठ्या प्रमाणात चालना आणि प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.  

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *