1940 आणि 1950 च्या दशकातील 8 दुर्मिळ हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयचा खजिना समृद्ध.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील चित्रपटांच्या मोठ्या संपादनात, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयच्या संग्रहात 31 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट जोडले आहेत. ज्येष्ठ विनोदी अभिनेते मास्टर भगवान अभिनीत सहा चित्रपटांचा संग्रह हे या कलेक्शन चे वैशिष्ट्य आहे. 1948 च्या ‘लालच’ आणि 1949 चा ‘बचके रहना’ ज्यामध्ये मास्टर भगवान यांनी अभिनय केला आणि या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले, या यादीत ‘सिनबाद द सेलर’ (1952), वजीर-ए-आझम (1961), रात के अंधेरे में (1969) आणि गुंडा यांचा समावेश आहे. (1969).
“हि वास्तविकदृष्ट्या महत्वाची प्राप्ती आहे कारण या संपादनातील किमान आठ चित्रपट अत्यंत दुर्मिळ आहेत आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया च्या कलेक्शन साठी नवीन आहेत. यापैकी दोन ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट, लालच (1948) आणि बचके रहना (1949), मास्टर भगवान यांनी दिग्दर्शित केले होते आणि त्यात बाबूराव पहेलवान, मास्टर भगवान आणि लीला गुप्ते हे कलाकार होते. या दोन्ही चित्रपटांना सी रामचंद्र यांचे संगीत आहे”, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. हे सर्व चित्रपट 16 मिमी स्वरूपातील ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहेत. “1940 आणि 1950 च्या दशकातील सेल्युलॉइड चित्रपट आता सापडले आहेत या वस्तुस्थितीमुळे हा खरोखर संग्रहाचा खजिना आहे. या 8 चित्रपटांच्या प्राथमिक तपासणीत ते चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येते,” श्री मगदूम म्हणाले.
संग्रहातील मनोरंजक चित्रपट म्हणजे नानुभाई वकील दिग्दर्शित मिस पंजाब मेल (1958). योगायोगाने, चित्रपटाची पटकथा कैफी आझमी यांनी लिहिली होती, ही त्यांची सुरुवातीची स्क्रिप्ट होती.
नानाभाई भट्ट यांचा अरेबियन नाइट्सच्या कथांवर आधारित एक काल्पनिक चित्रपट, सिनबाद द सेलर (1952) ज्यात नसीम, निरुपा रॉय, मास्टर भगवान, जयंत आणि प्राण यांच्यासोबत लोकप्रिय दक्षिण भारतीय स्टार रंजन यांनी भूमिका केली होती. होमी वाडिया आणि नानाभाई भट्ट प्रॉडक्शन असलेल्या या चित्रपटात बाबूभाई मिस्त्री यांचे उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट होते.
टारजन और हर्क्युलस (1966) हा संग्रहातील आणखी एक दुर्मिळ चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ विनोदी अभिनेते मेहमूद यांनी केले होते. या चित्रपटात हबीब, हर्क्युलस आणि शकिला बानो भोपाली यांच्या भूमिका होत्या. सुलतान दिग्दर्शित प्रोफेसर आणि जादूगर हे 1967 ज्यात इंदिरा (बिल्ली) आणि इंद्रजीत यांच्यासह दलपत, जिलानी, मिनू मुमताज, शम्मी होते.
बाबूभाई मिस्त्री दिग्दर्शित डाकू मानसिंग (1966) हा शेख मुख्तार, दारा सिंग, हर्क्युलस आणि शकिला बानो भोपाली अभिनीत संग्रहातील आणखी एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे. एका दयाळू आणि प्रामाणिक माणूस परिस्थितीमुळे कसा डाकू बनला जातो याची ही कथा आहे.
ज्येष्ठ गायक मन्ना डे यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही चित्रपटांना संगीत दिले होते आणि नाग चंपा (1958) हा त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. निरुपा रॉय, मनहर देसाई आणि ललिता पवार यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा पौराणिक कृष्णधवल चित्रपट विनोद देसाई यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला होता.
संग्रहातील इतर चित्रपटांमध्ये सुरैया अभिनीत दिल्लगी (1949), नलिनी जयवंत अभिनीत जादू (1951), देव आनंद आणि नलिनी जयवंत अभिनीत आणि के. ए अब्बास दिग्दर्शित राही (1952), श्यामा आणि तलत मेहमूद अभिनीत दिल ए नादान (1953), राजा परांजपे आणि शशिकला अभिनीत चाचा चौधरी (1953) आणि शांतीलाल सोनी यांचा महिपाल आणि विजया चौधरी अभिनीत नागा मोहिनी (1963) यांचा समावेश आहे.