युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले; विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार

219 students stranded in Ukraine return safely to Mumbai; The students thanked the Indian Embassy and the state government

युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले; विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार

मुंबई : एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी 219 विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला घेऊन येणारं विमान आज रात्री पावणेनऊच्या सुमारालाStudents from Ukraine reached at Mumbai Air Port मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. एअर इंडियाच्या या विमानानं रोमानियामार्गे भारतात उड्डाण केलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये राज्यातलेही अनेक विद्यार्थी आहेत

यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.

विद्यार्थ्यांना  आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. मुंबईत  परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपुर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्याचा समावेश आहे.मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी शासनाने केलेल्या मदतीबद्दल अभार व्यक्त केले.

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे  वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र  शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये राज्यातलेही अनेक विद्यार्थी आहेत. पालघर जिल्हा प्रशासनाकड़े युक्रेनमध्ये अडकलेल्या १२ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातले १० पेक्षा अधिक विद्यार्थी रशिया आणि युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परतण्यासाठी भारतीय दूतावासाचे प्रयत्न सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यातले नऊ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. जिल्हा प्रशासनानं या विद्यार्थ्यांची माहिती केंद्र सरकारकडे पाठवली आहे.

सर्व प्रवाशांना लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र किंवा RT-PCR चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असेल, त्यांना नियमाप्रमाणे विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल. या विद्यार्थ्यांना जेवणा बरोबरंच वैद्यकीय मदतही दिली जाणार आहे.

दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेन मध्ये राज्यातील आणखी सुमारे 1200 ते 2000 विद्यार्थी विद्यार्थिनी अडकल्याचा प्राथमिक अंदाज असून केंद्र सरकारच्या सहकार्यातून त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु आहेत मात्र या मुद्द्यावर कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केलं.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु असून राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत नेण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने उचलली असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.

युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्याची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे.  सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच हॉटॲप क्र.9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in  या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *