सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘४५ व्या भारतीय भूगोल काँग्रेस’चे आयोजन

Savitribai Phule Pune Universiy

’45th Indian Geography Congress’ at Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘४५ व्या भारतीय भूगोल काँग्रेस’चे आयोजन

तीन दिवसीय परिषदेत ६०० वर तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित राहणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमत्त ‘४५ व्या भारतीय भूगोल काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण, विकास आणि शाश्वतता – संवेदनक्षम भविष्यासाठी भूगोलाची अत्यावश्यकता’ या विषयावर ही परिषद होणार आहे. १४ ते १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेचे उद्धाटन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून फ्रांसमधील रियुनियन आयलँड या विद्यापीठातील भूगोल या विषयाचे प्रा. डॉ. बीट्रिस मोपर्ट, श्रीलंकेमधील केलानिया विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रा. एल. एम. धरमसीरी, आंध्रा विद्यापीठातील भूगोल या विषयाच्या प्राध्यापिका डॉ. हेमा मालिनी, बिहारच्या मगध विद्यापीठातील प्रा. डॉ. राना प्रताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. सुधाकर परदेशी हे उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाच्या अध्यपदी केरळमधील सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजचे प्रा.श्रीकुमार चट्टोपाध्याय हे असतील.Savitribai Phule Pune University

विद्यापीठाच्या भुगोल विभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ जिओग्राफ्रर्स इन इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने याचे आयोजन करण्यात आले आहे. २१ व्या शतकात विकास, पर्यावरण या बाबात विविध स्तरावर नवनविन आव्हने अनुभवास येत आहेत. याची तिव्रता कमी करून साधन संपत्तीचे संवर्धन, सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्यासाठी लागणाऱ्या विश्लेषणाची व उपाययोजनांमध्ये भूगोल या विषयाचे महत्त्व असाधारण आहे. त्यामुळे या परिषदेत स्थानिक ते जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या व विकासाच्या विषयांवर सखोल चर्चा होऊन भौगोलिक दृष्टिकोनातून उपाययोजना व यांची शाश्वतता या दृष्टिने चर्चेचे आयोजन केले आहे.

या परिषदेसाठी अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियातील प्रतिनिधी सहभागी होणार असून येथील तज्ञ प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांचे मार्गदर्शन करणार आहेत. तर देशभरातील ६०० पेक्षा जास्त प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे. गुरूवारी १४ तारखेला सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात या परिषदेचे उद्धाटन होणार आहे. या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान आयोजक प्रा. रविंद्र जायभाय यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
20 डिसेंबरला ‘सांगायचंच आहे’ या नाटकाचा पुण्यात प्रयोग
Spread the love

One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘४५ व्या भारतीय भूगोल काँग्रेस’चे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *