52 व्या इफ्फी चित्रपट महोत्सव 2021 साठी भारतीय पॅनोरमाच्या चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर.

52-IFFI-Goa The International Film Festival of India

52 व्या इफ्फी चित्रपट महोत्सव 2021 साठी भारतीय पॅनोरमाच्या चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर.

गोव्यात सुरु होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,  52 व्या इफ्फीदरम्यान भारतीय पॅनोरमा अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली. 52-IFFI-Goa The International Film Festival of India

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे गोवा राज्य सरकारतर्फे 20 ते 28 नोव्हेंबर, 2021 दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. निवडण्यात आलेले सगळे चित्रपट सर्व नोंदणीकृत प्रतिनिधी आणि निवडक चित्रपटांच्या प्रतिनिधी यांना इफ्फीदरम्यान दाखवले जाणार आहेत..

भारतीय पॅनोरमाचा मुख्य उद्देश या महोत्सवात भारतीय निर्मात्यांनी तयार केलेल्या चित्रपट आणि माहितीपटांची निवड करणे हे असून त्यासाठी चित्रपटाची निर्मिती, संकल्पना आणि इतर सौन्दर्यातील उत्कृष्टतेचे निकष तपासले जातात. चोखंदळपणे निवडलेल्या भारतीय चित्रपट कलेचे विविध श्रेणींअंतर्गत प्रदर्शन करुन, त्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी या अंतर्गत पार पडली जाते.भारतीय पॅनोरमाच्या स्थापनेपासूनच त्या अंतर्गत त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात.

चित्रपट निवड समितीच्या ज्युरी सदस्यांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत चित्रपट निर्माते आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे.फिचर (कथा)आणि नॉन फिचर (कथाबाह्य) अशा दोन्ही चित्रपटांची निवड करण्यासाठी ज्युरी सदस्यांच्या वैयक्तिक अनुभवांच्या आणि अभ्यासाच्या आधारे या पॅनोरमाची निवड करतात.

फिचर चित्रपट(कथा चित्रपट)

यंदाच्या इफफीसाठी   फिचर फिल्म प्रकारात चित्रपट निवडण्यात आले आहेत. 221 समकालीन भारतीय चित्रपटांमधून हे 24 चित्रपट निवडण्यात आले आहेत. या पैकेजमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील विविधरंग आणि वैविध्याचे दर्शन घडते.

फिचर फिल्मच्या ज्युरी सदस्यांमध्ये 12 सदस्य असून, या समितीच्या अध्यक्षपदी एस.व्ही. राजेंद्र सिंग बाबू आहेत. तसेच या ज्युरी सदस्यांमध्ये असे सदस्य आहेत ज्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध उत्तम चित्रपटांची निर्मिती केली असून अनेक चित्रपट संस्था किंवा व्यवसायांचे ते प्रतिनिधी आहेत. हे सर्व सदस्य मिळून भारतीय चित्रपट सृष्टीचे समग्र प्रतिनिधित्व करतात:

  1. श्री राजेंद्र हेगडे, आत्मचरीत्रकार
  2. मखोन्मानी मोंगसाबा, चित्रपट निर्माते
  3. विनोद अनुपमा, चित्रपट समीक्षक
  4. जयश्री भट्टाचार्य, चित्रपट निर्मात्या
  5. ज्ञान सहाय, छायाचित्रकार
  6. प्रशांतू मोहपत्रा, छायाचित्रकार
  7. हेमेंद्र भाटिया, अभिनेता/लेखक/चित्रपट निर्माते
  8. असीम बोस, छायाचित्रकार,
  9. प्रमोद पवार, अभिनेता
  10. आणि
  11. चित्रपट निर्माता मंजुनाथ टी एस, छायाचित्रकार
  12. मलय रे,चित्रपट निर्माते
  13. पराग चाफेकर,चित्रपट निर्माते/ पत्रकार.

इंडियन पॅनोरमामध्ये निवड झालेल्या 24 चित्रपटाची यादी खालील प्रमाणे आहे:

अनु क्र चित्रपटाचे नाव भाषा दिग्दर्शक
कालकोकोहो बंगाली राजदीप पॉल आणि शर्मिष्ठा मैती
नितंतोई सहज सरल बंगाली सत्राबीत पॉल
अभिजान बंगाली परंबात्रा चटोपाध्यय
माणिकबाबूर मेघ बंगाली अभिनंदन बॅनर्जी
सिजोऊ बोडो विशाल पी छलिया
सेमखोर दिमासा ऐमी बरुआ
21वा टिफिन गुजराती विजगिरी बावा
एट डाऊन तुफान मेल हिंदी अंकित सिंग
अल्फा बीटा गामा हिंदी शंकर श्रीकुमार
डोल्लू कन्नड सागर पुराणिक
तलेदंड कन्नड प्रवीण कुरुपकर
ऍक्ट – 1978 कन्नड मंजुनाथ एस. (मैसूर)
निली हक्की कन्नड गणेश हेगडे
निराये ठाठाकलूल्ला माराम मल्याळम जयराज
सनी मल्याळम रणजित शंकर
मी वसंतराव मराठी निपुण अविनाश धर्माधिकारी
बिटरस्वीट मराठी अनंत नारायण महादेवन
गोदावरी मराठी निखिल महाजन
फ्युनरल मराठी विवेक राजेंद्र दुबे
निवास मराठी मेहुल अगजा
बुम्बा राईड मिशिंग बिस्वजित बोरा
भागवादज्जुकम संस्कृत यदु विजयकृष्णन
कुझंगल तामिळ विनोथराज पी एस
नाट्यम तेलुगू रेवंथ कुमार कोरुकोंडा

भारतीय पॅनोरमा 2021 साठी उदघाटनाचा चित्रपट म्हणून ज्यूरींनी निवडलेला चित्रपट आहे- सेमखोर (दिमासा) श्रीमती ऐमी बरुहा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट

नॉन फिचर( कथा बाह्य) चित्रपट

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमामध्ये सामाजिक आणि सौन्दर्यदृष्ट्या विविधरंग असलेल्या सामाजिक कथाबाह्य चित्रपटांचा समावेश आहे. माहितीपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सन्माननीय ज्युरी सदस्यांनी महितीपटांची निवड केली आहे.

नॉन – फिचरच्या सात परीक्षकांच्या चमूचे नेतृत्व प्रसिद्ध माहितीपट निर्माते एस नल्लामुथु यांनी केले. परीक्षकांच्या चमूत खालील सदस्य होते.

  1. आकाशादित्य लामा, चित्रपट निर्माते
  2. सिबानू बोरा, माहितीपट निर्माते
  3. सुरेश शर्मा, चित्रपट निर्माता
  4. सुब्रत ज्योती नियोग, चित्रपट समीक्षक
  5. मनीषा कुलश्रेष्ठ, लेखिका
  6. अतुल गंगवार, लेखक

203 समकालीन भारतीय नॉन फिचर चित्रपटांमधून निवडलेले चित्रपट आपल्या प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या नोंदी घेण्याच्या, शोधकवृत्तीचे आणि मनोरंजन करण्याच्या क्षमतेचे तसेच समकालीन भारतीय मूल्यांचे उत्तम उदाहरण आहे.

एकूण 20 नॉन – फिचर फिल्म्स इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

या विभागात निवड झालेल्या 20 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे :

अ.क्र. चित्रपटाचे शीर्षक भाषा दिग्दर्शक
वीरांगना आसामी किशोर कलिता
नाद– द साऊंड बंगाली अभिजित ए पॉल
सैनबरी टू संदेशखाली बंगाली संघमित्रा चौधरी
बादल सरकार अँड द अल्टरनेट थिएटर इंग्रजी अशोक विश्वनाथ
वेद.. द व्हिजनरी इंग्रजी राजीव प्रकाश
सरमाउंटीग चॅलेंजेस इंग्लिश सतीश पांडे
सनपट (Sunpat) गढवाली राहुल रावत
द स्पेल ऑफ पर्पल गुजराती प्राची बजानिया
भारत, प्रकृती का बालक हिंदी डॉ. दीपिका कोठारी अँड रामजी ओम
तीन अध्याय हिंदी सुभाष साहू
बबलू बेबीलॉन से हिंदी अभिजीत सारथी
द नॉकर हिंदी अनंत नारायण महादेवन
गंगा पुत्र हिंदी जय प्रकाश
गजरा हिंदी विनीत शर्मा
जुगलबंदी हिंदी चेतन भाकुनी
पाबुन्य स्याम मणिपुरी हबोम पबन कुमार
मर्मर्स ऑफ द जंगल मराठी सोहिल वैद्य
बॅकस्टेज उडिया लिपिका सिंग दराईब
विच संथाली जॅकी आर. बाला
स्वीट बिरीयानी तामिळ जयचंद्र हाश्मी

भारतीय पॅनोरमा मध्ये कथाबाह्य चित्रपट विभागात ज्यूरींनी निवड केलेला उदघाटनाचा चित्रपट म्हणजे- वेद… द  व्हिजनरी हा राजीव प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *