6530 vials of Remedesivir injection distributed to patients in Pune

6530 vials of Remedesivir injection distributed to patients in Pune

As of 12/05/2021, a total of 16293 functional beds in 626 Covid Hospitals in the Pune district have been supplied to the hospitals through stockists in the amount of 6530 injections. In this regard, it has been observed that the relatives of the patients are given prescriptions through the hospital to purchase Remedesivir injections. So there was a rush of relatives of the patients. This injection is not currently available on the market. But the prescription given to the relatives of the patients to buy Remedesivir injections has been found to be leading to its black market. Therefore, no hospital should give prescriptions to the relatives of the patients to buy Remedesivir injections. If such a case is found, the supply of Remedesivir injection to the concerned hospital will be frozen, a warning has been issued by a separate circular from the District Collector’s Office.

From 16/04/2021, the available stock of Remedesivir injection is being distributed to all the hospitals on an equal basis daily. So that all Covid Hospitals will have direct stock available to their patients. Considering the shortage of remedesivir injection in Pune district, 24 x 7 remedesivir control room has been made operational in the Collectorate Pune from 11/04/2021. Through them, the availability and proper use of Remedesivir from hospitals, stockists, and distributors are being monitored. All the hospitals are being instructed to use this injection as per the instructions of the health department.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या 6530 व्हायल्स पुण्यातील रुग्णांना वितरित.

दिनांक 12/05/2021 रोजी पुणे जिल्हयातील एकुण 626 कोविड हॉस्पीटल्समध्ये असलेल्या 16293 फंक्शनल बेडसच्या प्रमाणात 6530 इंजेक्शनसचा पुरवठा हॉस्पीटलसला स्टॉकिस्ट मार्फत करण्यात आला आहे.दररोज प्राप्त होणा-या माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांचे बेडसच्या प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत आहे. 

सदर बाबत असे ही निदर्शनास आले आहे की, हॉस्पिटल मार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात येते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. हे इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध नाही. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात आल्यामुळे त्याचा काळाबाजार होण्यास चालना मिळत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोणतेही हॉस्पीटलने रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात देऊ नये. अशी बाब आढळून आल्यास संबंधीत हॉस्पीटल यांना केला जाणारा रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा गोठवण्यात येईल, असा  इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे. 

दिनांक 16/04/2021 पासून रेमडेसीवीर इंजेक्शनचा उपलब्ध साठा दैनंदीन तत्वावर सर्व रुग्णालयांना समान तत्वावर वाटप करण्यात येत आहे. जेणेकरून सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांचे रुग्णांना थेट साठा उपलब्ध होईल. पुणे जिल्हयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दि.11/04/2021 पासुन 24 x 7  रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.रेमडेसिवीर काळाबाजार रोखणेचे अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली असून त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुयोग्यवापर यावर नियंत्रण ठेवणेत येत आहे.

आरोग्य विभागाचे निर्देशानुसार गरजु रुग्णांना या इंजेक्शनचा वापर करावा, असे सर्व रुग्णालयांना निर्देश देण्यात येत आहेत. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *