Now soon a multispeciality hospital at Hadapsar. MLA Tupe submits the plan to the Additional Commissioner.
In the last few years, Hadapsar has been developed all around, along with a variety of amenities provided by the people’s representatives. There is no shortage of private multispeciality Hospitals in Hadapsar. However, there was no government multispeciality hospital in Hadapsar. MLA Tupe took the initiative and submitted a plan to the Additional Commissioner to have an affordable multispeciality hospital in Hadapsar.
MLA Chetan Tupe presented the plan of the new hospital to be constructed for setting up a multispeciality hospital at Hadapsar to the Additional Commissioner. So the work should be started immediately. MLA Tupe also expressed readiness to provide the required funds immediately.
The proposal submitted by MLA Tupe will be approved, and all necessary administrative approvals will be given to start the work soon,
said Rubel Agarwal, Additional Commissioner , Pune Municipal Corporation.
Municipal Corporation Additional Commissioner Rubel Agarwal and MLA Chetan Tupe inspected the Annasaheb Magar Hospital at Magarpatta Chowk. Former Mayor Nilesh Magar along with officials of the Municipal Health Department, Hadapsar Regional Office, and Construction department officials was present on the occasion.
MLA Chetan Tupe said that the construction of the hospital should be done in two phases so that the patients can be accommodated at the place where the present hospital is running and after the completion of the construction of the hospital building in the open space, the hospital can be shifted to the old site.
The proposal submitted by MLA Tupe will be approved, and all necessary administrative approvals will be given to start the work soon, said Rubel Agarwal.
आता हडपसर येथे लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,आमदार तुपे यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे ही योजना केली सादर.
गेल्या काही वर्षात हडपसरचा विकास चहूबाजूने झाला, या बरोबरच विविध प्रकारच्या सोई सुविधा पण लोक प्रतिनिधींनी उपलब्ध करून दिल्या. हडपसर मध्ये खासगी मल्टीस्पेशालिटी कमतरता नाही. फक्त उणीव होती ती सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची. सर्वसामांन्यांना परवडेल असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हडपसर मध्ये असावे, यासाठी आमदार तुपे यांनी पुढाकार घेऊन अतिरिक्त आयुक्तांकडे आराखडा सादर केला.
हडपसर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभाराण्यासाठी नवीन बांधण्यात येणार्या हॉस्पिटल चा आराखडा आमदार चेतन तुपे यांनी अतिरिक्त आयुक्तांना सादर केला. हे काम त्वरित चालू करावे. यासाठी लागणारा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची तयारीही आमदार तुपे यांनी यावेळी दर्शवली.
आमदारांच्या प्रस्तावास सर्वांनी मान्यता देऊन हे काम लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मंजुरी देऊ, असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी रुबल अग्रवाल यांनी दिला.
मगरपट्टा चौक येथील महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयाची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आमदार चेतन तुपे यांनी केली. यावेळी माजी महापौर निलेश मगर यांच्यासह महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, हॉस्पिटल बांधकाम दोन टप्प्यांमध्ये बांधावे, म्हणजे आत्ताचे हॉस्पिटल चालू आहे त्या ठिकाणी रुग्णांची सोय करता येईल व मोकळ्या जागेत हॉस्पिटलची इमारत बांधून पूर्ण झाल्यावर जुन्या जागेतील हॉस्पिटल स्थलांतरित करता येईल व फेस टू चे काम त्या ठिकाणी करता येईल.