80 per cent of adults in the country have completed corona vaccination
देशातील 80 टक्के प्रौढ व्यक्तिंचे कोरोना लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली : १८ वर्षांहून अधिक वयाच्या देशातल्या ८० टक्क्यांहून अधिक पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
देशातल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीच्या आतापर्यंत १७५ कोटींहून अधिक मात्रा मिळाल्या आहेत. ९६ कोटी २० लाखांहून अधिक व्यक्तींनी एक मात्रा घेतली असून ७७ कोटींहून अधिक जणांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. पावणे २ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. तर १५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना सुमारे पावणे ८ कोटी मात्रा मिळाल्या आहेत.
राज्यात आतापर्यंत १५ कोटी ३६ लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या असून ८ कोटी ७० लाखांहून अधिक व्यक्तींना पहिली तर साडे ६ कोटींहून अधिक जणांना दुसरी मात्रा मिळाली आहे. सुमारे सव्वा १४ लाख लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. १५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना ४६ लाखांहून अधिक मात्रा मिळाल्या आहेत.