An online seminar by the Department of Skill Development, Employment, and Entrepreneurship tomorrow.
To discuss in detail the Apprentice Scheme required for the industrial sector in the country, the scope, nature, and implementation of the scheme, a free seminar on ‘Benefits of Apprentice Scheme to the Industry’ will be organized for Pune and Satara districts on May 21 at 11.30 am. Sachin Jadhav, Assistant Commissioner, Skill Development, Employment, and Entrepreneurship, has given the information in a press release.
Sanjay Chhatre, Director, Yashaswi Academy for Skills, and Prashant Kulkarni, Manager, Corporate Relations, Yashasvi Sanstha will be participating in the seminar. Maximum manpower managers should register for this seminar. For enrollment in the seminar need to use the following link http://tiny.cc/sded_apprenticeship
This is a free seminar for manpower managers.
Sachin Jadhav, Assistant Commissioner, Skill Development, Employment, and Entrepreneurship has also appealed.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने उद्या ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन.
देशातील उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक असलेली अप्रेन्टिस योजना, योजनेची व्याप्ती, स्वरुप व अंमलबजावणी या विषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी, ‘अप्रेन्टिस योजनेचे उद्योगजगताला होणारे फायदे’ या विषयावरील मोफत परिसंवादाचे पुणे व सातारा जिल्ह्यासाठी २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
ऑनलाईन होणाऱ्या परिसंवादात यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे व यशस्वी संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन विभागाचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी या मान्यवरांचा या परिसंवादात सहभागी होणार आहे. अधिकाधिक मनुष्यबळ व्यवस्थापकांनी या परिसंवादासाठी नाव नोंदणी करावी. या मोफत होणाऱ्या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर http://tiny.cc/sded_apprenticeship
नाव नोंदणी करण्याचे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.