The administration neglects waste in the Hadapsar area.

The administration neglects waste in the Hadapsar area.

There is a realm of garbage everywhere in and around Hadapsar. In the last few days, its news was published in various newspapers with photos. But it does not appear to have been noticed by the municipal administration. In a few days, the rains will start, in the rainy season, the same waste invites epidemics.

Garbage on road opp Aakashwani, Hadapsar
The administration neglects waste in the Hadapsar area.

Garbage can be seen in many places even in the newly incorporated Phursungi. This scene in front of PMPML’s charging station has become routine. Garbage has also been lying in the Virungula center near Raghukul Plaza in front of All India Radio for the last several days. Since there is no garbage can in this place, citizens throw garbage on the road. The situation is similar under the Fursungi bridge. Garbage can also be found lying on the road. The chambers were cleaned for rainwater in front of the Hotel Atithi to Amarbagh Society on Solapur Road, but the stench has spread as the waste is still lying on the road.

There is a pile of garbage in the Nala near Vitthal petrol pump on Saswad road. The same situation is with the old canal of Hadapsar, from Shinde Vasti in Hadapsar village to Solapur Road, Anandnagar to Siram Institute, the canal is littered with garbage. This has led to the spread of stench in the area, as well as inviting diseases like malaria and dengue during the monsoon season. Citizens are expecting the irrigation and municipal administration to take action before the monsoon.

हडपसर परिसरात  कचऱ्याकडे  प्रशासनाचे दुर्लक्ष . 

हडपसर आणि जवळपासच्या परिसरात जिकडे तिकडे कचऱ्याचं साम्राज्य जाणवत आहे.  गेल्या काही दिवसात विविध वर्तमानपत्रामध्ये याच्या बातम्या फोटोसहित प्रसिद्ध झाल्या होत्या. पण पालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेतलेली दिसून येत नाही. 

काही दिवसातच पावसाळा सुरु होईल,  पावसाळ्यात हाच कचरा साथीच्या आजारांना निमंत्रण देतो.  महापालिकेत नवीनच समाविष्ठ झालेल्या फुरसूंगी मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. PMPML च्या चार्जिंग स्टेशन समोर हे दृश्य नित्याचेच झालेले आहे.  आकाशवाणी समोर रघुकुल प्लाझा शेजारील  विरुंगुळा केंद्रात सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून कचरा पडलेला आहे. या ठिकाणी कचराकुंडी नसल्यामुळे नागरीक रस्त्यावर कचरा टाकतात .  फुरसुंगी पुलाखाली सुद्धा हीच परिस्थिती आहे. फुरसूंगी मालधक्का रस्त्यावर सुद्धा ठिकठिकाणी कचरा पडलेला आढळतो. सोलापुर रस्त्यावर  हॉटेल अतिथी ते अमरबाग  सोसायटी समोर  पावसाळी कामासाठी चेम्बर्सची सफाईचे काम करण्यात आले, पण त्यामधून काढलेला कचरा अजूनही रस्त्यावर पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. 

 

Solapur Road Opp Akkashwani
हडपसर परिसरात कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष .

सासवड रस्त्यावर विठ्ठल पेट्रोल पम्पाशेजारील नाल्यात कचऱ्याचा ढीग  पडलेला आहे. तीच स्थिती हडपसरच्या जुन्या कालव्याची, हडपसर गावामधील शिंदे वस्ती पासून   सोलापूर रस्ता, आनंदनगर  ते सिरम इन्स्टिटयूट, पर्यंत कालव्यामध्ये कचरा पडलेला आहे.  यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे, त्याबरोबरच मलेरिया, डेंगू या सारख्या आजारांना ऐन पावसाळ्यात निमंत्रणच आहे. पाटबंधारे आणि पालिका प्रशासनाने यावर पावसाळ्या पूर्वी  कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त्त केली जात आहे. 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *