9 नोव्हेबर 2021 रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job Fair Logo

9 नोव्हेबर 2021 रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.

पुणे : जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 9 नोव्हेबर 2021 रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Job Fair Logo
Image by : Freepikpsd.com

एचएससी, पदवीधर व पदविकाचे विविध ट्रेड यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, ऑटोमोबाईल, टूल अॅन्ड डायमेकर इत्यादी प्रकारची पदे उपलब्ध असून, या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घेता येईल. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswwam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांसाठी रोजगार नोंदणी केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. रोजगार नोंदणी केली नसल्यास आधी नोंदणी करून नंतर अर्ज सादर करावा. या मेळाव्यासाठी नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवून ऑनलाईन रिक्तपदे अधिसूचित केली आहेत,

याबाबत काही अडचण आल्यास ०२०-२६१३३६०६ या संपर्कक्रमाकांवर संपर्क करावा. या संकेतस्थळावर रोजगार उपलब्धतेबाबत दररोज माहिती अद्ययावत करण्यात येते. उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती पहावी व पसंतीनुसार मेळाव्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्री नलावडे यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *