Class X and XII examinations will be held offline.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ऑफलाइनच होणार असल्याचं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे.
दहावीसाठी १६ लाखापेक्षा जास्त तर बारावीसाठी १२ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन या परीक्षा होणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं.