मुंबईत ताडदेव इथल्या इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू, २९ जण जखमी.

Maharashtra: Six dead, 15 injured in Mumbai residential building fire.

मुंबईत ताडदेव इथल्या इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू, २९ जण जखमी.

मुंबई: मुंबईतील ताडदेव परिसरात एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला (6 persons have died ) असून ; २९ जण जखमी झाले आहेत.Six dead, 15 injured in Mumbai residential building fire

यापैकी ५ जणांचा नायर रुग्णालय तर एका व्यक्तिचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गवालिया टँक परिसरात कमला इमारतीतल्या(fire that broke out on the 18th floor) १८ व्या मजल्यावर सकाळी ही आग लागली.

चिंचोळ्या गल्लीमुळं अग्निशमन दलाच्या जवानांना याठिकाणी पोहोचण्यात अडचणी आल्या. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी ही आग पूर्णपणे विझवण्यात आली, असं मुंबई महापालिकेनं सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *