सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही सिंधुच्या विरोधात मालविका बनसोड.

Syed Modi International: P V Sindhu to face compatriot Bansod Malvika in final today.

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही सिंधुच्या विरोधात मालविका बनसोड.

लखनौ : बॅडमिंटनमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने काल संध्याकाळी लखनौ येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. बाबू बनारसी इनडोअर स्टेडियमवर काही मिनिटे चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय शटलरने रशियाच्या इव्हगेनिया कोसेत्स्कायाला पराभूत केले.
उपांत्य फेरीत सामना सुरू असताना जखमी झाल्यानं सिंधुची प्रतिस्पर्धी इवजेनिया कोसेस्कायानं माघार घेतली होती. या सामन्यातल्या पहिल्या फेरीत तिच्यावर सिंधुनं २१-११ अशी मात केली होती. 
बॅडमिंटनमध्ये सैद मोदी आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दोन वेळेची ऑलिम्पिकपदक विजेती पी. व्ही. सिंधु हिचा सामना नागपूरच्या मालविका बनसोड सोबत होणार आहे. 

मालविकानं उपांत्य फेरीत अनुपमा उपाध्यायला १९-२१, २१-१९, २१-७ असं पराभूत केलं. यास्पर्धेत सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मालविकानं साईना नेहवालचा पराभव केला होता.

पुरुष एकेरीत भारताचं विजेतेपदाचं स्वप्न मात्र संपुष्टात आलं आहे. मिथुन मंजुनाथला उपांत्या फेरीत फ्रान्सच्या अरनौड मर्केल विरोधात १९-२१, २१-१७,९-२१ असा पराभव स्विकारावा लागला. अंतिम फेरीत आता मर्केलचा सामना लुका क्लेअरबाऊट विरुद्ध होणार आहे. 
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *