Pune ranks first in the number of Omicron victims in the state.
राज्यात ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत पुणे पहिल्या क्रमांकावर.
मुंबई: सध्या राज्यातले कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात आहेत.ओमिक्रॉनचेही सर्वाधिक रुग्ण इथेच आहेत.
सध्या पुणे जिल्ह्यातल्या उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार आहे. ही संख्या राज्यातल्या एकंदर रुग्णांच्या 28 टक्के आहे. त्याखालोखाल 51 हजार उपचाराधीन रुग्ण ठाण्यात तर 22 हजार रुग्ण मुंबईत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात देण्यात आली आहे.
आणखी 8-10 दिवसांनी पुणे जिल्ह्यातली कोरोनाची लाट ओसरू लागेल आणि जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या खाली येईल असा अंदाज राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला आहे.